वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अनियंत्रित ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर : २५ ऑगस्ट – नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गोंडखैरी लगतच्या चौदामैल, पेठ (काळडोंगरी) शिवारात सकाळी ९ :३0 वाजेच्या सुमारास वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अनियंत्रित ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ३४ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपूर-अमरावती राज्य महामार्ग ५६ वर पुणेवरून रायपूरला जाणारी हंस कंपनीची ट्रॅव्हल्स एन. एल. 0७ / बी. 0६0६ क्रमांकाची ट्रॅव्हल्स चौदामैल, पेठ (काळडोंगरी) शिवारात सकाळी ९.३0 च्या सुमारास वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे मार्गावरून २00 फुट फरफटत जाऊन उलटली. यामध्ये ३४ प्रवासी होते, यातील २0 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. ट्रॅव्हल्स पुणे येथून मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्यादरम्यान रायपूरकरिता अंदाजे ३४ प्रवासी घेऊन निघाली. चालक मोनू अजबलाल राव (वय ३८, सूरजनगर, इंदौर, मध्यप्रदेश) या चालकाने अर्धा प्रवास सुरळीत पार पाडला. मात्र, काळडोंगरी शिवारात ट्रॅव्हल्स उलटली. यात ३४ प्रवाशांपैकी २0 प्रवासी किरकोळ जखमी झाले. चालक मोनू राव वय ३६ रा. इंदौर, चालक इमरान खान वय ४0 रा. इंदौर, उर्वशी रजत वय ३0 रा. छत्तीसगड, चित्रलेखा शाहू वय ३0 रा. पुणे, अजित सिंग वय ३३ रा. पुणे, श्रेयस जाधव वय २५ रा. सातारा, स्नेहल पवार वय २१ रा. सातारा, शंकर घुगे वय २२ रा. मालेगाव जि. वाशीम हे सर्व किरकोळ जखमी झाले असून, सर्वांवर उपचार करण्यात आले. घटनास्थळी खुर्सापार येथील वाहतूक पोलिस उपनिरीक्षक नीलेश भिलावे, पोलिस उपनिरीक्षक विशांत नांदगाये पो. ह. सुरेश डायरे, महेंद्रसिंग गौर, राजेंद्र पाटील, लक्ष्मण बन्ने, कमलेश गेटमे, भुवन शाहने, महेश वरूडकर, क्रिष्णा मनोहर, रवी ठाकरे, दीपक ढोके, दीपाली कुकडे या सर्व पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत फसलेले प्रवाशांना काढून त्यांना दोन १0८ रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल होऊन प्राथमिक उपचार करण्यात आला. दोन क्रेनच्या साहाय्याने ट्रॅव्हल्स काढण्यात आली. रायपूरला जाण्यासाठी दुसरी ट्रॅव्हल्स बोलावून काही जखमींना पुढच्या प्रवासासाठी पाठविण्यात आले. सर्व प्रवासी घाबरलेले होते. वृत्त लिहिस्तोवर गुन्ह्य़ांची नोंद झाली नाही. घटनास्थळावर कळमेश्वर पोलिस व खुर्सापार वाहतूक पोलिसांनी पंचनामा करून महामार्ग सुरळीत केला. पुढील तपास ठाणेदार आशिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार लक्ष्मण रुडे, अंमलदार रवींद्र बुरांडे, संजू नट, विशाल बडदे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply