अमोल मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग – महेश शिंदे

मुंबई : २४ ऑगस्ट – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान मागच्या तीन चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देत अमोल मिटकरींच्या आरोपांचे खंडण केले आहे.
आमदार शिंदे म्हणाले कि, पन्नास खोके एकदम ओके तुम्ही म्हणाला याला उत्तर देण्यासाठी आम्ही विधानभवनाच्या दारातील पायऱ्यांवर विरोधकांना उत्तर देण्यासाठी आम्ही लवासाचे खोके बारामती ओके असे म्हणाल्यावर त्या अमोल मिटकरींना झोंबलं त्यामुळे ते आमच्या आंदोलनात खोडा घालण्यासाठी आले त्यानंतर हे प्रकरण घडलं त्या अमोल मिटकरींना माझे एकच म्हणणे आहे. मागचे अडिच वर्षे तुम्ही बसून अर्थखाते धुवून खाल्ले त्यावेळी आम्ही तुम्हाला काही बोललो का?
झालेल्या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज बघून कारवाई करावी असे ही ते म्हणाले आम्ही विधासभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. अमोल मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो परंतु त्यांना हे झोंबल्याने आमच्या अंगावर ते आल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि आम्ही बाळासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकत काम करत आहोत. मागच्या अडीच वर्षात त्यांनी केलेल्या कृत्याचा परिणाम ते भोगत आहेत.
यावेळी मिटकरी म्हणाले, शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, त्यांनी आम्हाला आई बहीणीवरून शिवी दिली. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो असल्याचे मिटकरी यांनी सांगितली.
पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. आम्ही घोषणा दिल्या उलटा चोर कोतवाल को डाटे अशीच अवस्था सत्ताधाऱ्यांची झाली आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु यांनी जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधाना धरून नसल्याचे मिटकरी म्हणाले.

Leave a Reply