सततच्या पावसामुळे गोंदियात दोन मजली घर कोसळले

गोंदिया : २३ ऑगस्ट – राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. यानंतर अशीच एक घटना आता गोंदियामधून समोर आली आहे. या घटनेत दोन मजली घर कोसळल्याचं पाहायला मिळालं.
सततच्या पावसामुळे हे संपूर्ण घर ढासळून गेलं. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील हे घर अचानक कोसळलं. हे घर कोसळतानाचं दृश्य स्थानिक नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे. यात अगदी क्षणभरात दुमजली घर जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही क्षणातच हे संपूर्ण घर कोसळलं. सोमवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून या मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याचं समोर येत आहेत. व्हिडिओमध्ये घराच्या पाठीमागे काही लोक उभा असलेले दिसतात. मात्र, हे घर कोसळण्याची कल्पना त्यांना आधीच होती.
याच कारणामुळे घरामागे उभा असलेले लोक अतिशय सावधगिरी बाळगत होते. घर कोसळत असल्याचं जाणवताच ते तिथून मागे झाले. तर, अवघ्या क्षणभरातच हे घर जमिनदोस्त झालं. घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave a Reply