भरारी घे रे पाखरा…- नंदकुमार वडेर

हं हं तूला आता मोकळ्या आकाशात ऊडायचं आहे बरं का… कोणताही किंतू मनांत न आणता… एकदा नीट बघून पारखून घेशील किती मोठा आहे अवकाश… मनाचा करशील इरादा पक्का नि भरारी घेशील सावकाश… आजवरीचे सुरक्षित घराचे कवचाचे बंधन घातले गेले होते तूला…अलगद ते सोडवून घेशील ना पिल्ला … आता एका टोकावर फळीच्या थांबलायस तू अश्या ठिकाणी की परतून फिरण्याची संधीच गमावलीस… पुढे टाकलेले पाऊल दाखवतेय नवी आशा नवे स्वप्न…पायात आलेय नेट तुझ्या नि पंखात बळ…डोळे सांगतात तुझे आत्मविश्वासाची चमक… सगळे काही गोळा करून दाखव तुझी स्वतंत्र विहरण्याची आहेना धमक… कळू दे आम्हालाही काय असतो स्वातंत्र्याचा खरा अर्थ तो काय… अन तो मिळविण्यासाठी किंमत ती किती मोजावी लागली हाय… अन जाता जाता हे ही सांगशील स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे… जूने ते सारं काही टाकाऊ नव्हे… रुढी, परंपरा आणि संस्कारांचे बंधनाचे दोर ते, गगनाला गवसणी घातली तरी जमीनीला नाही विसरते… जगा नि जगू दया हाच संदेश तुझ्याकडून शिकायचेय… चल उड जा रे पंक्षी अब ये देश हुआ है…. ! गाण्याची धुन, सुराची तान चल घे आता उंचावून मान…मनी बाळग विहंगाचा अभिमान… भरारीची दाखवशील ऐटबाज शान….घे जगाचे खिळवून ध्यान…सोड सोड तो पण परंतु, किंतुचा अनमान…जा बेटया मार्गस्थ होई आकाशमान…

नंदकुमार वडेर, सांगली.
9920978470.

Leave a Reply