महिलेच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही, त्या स्वतः सशक्त – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १८ ऑगस्ट – अखिल भारतीय महिला चरित्र कोष प्रथम खंड – प्राचीन भारत पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, पुरुष श्रेष्ठ की नारी श्रेष्ठ यावर विवाद येतो. दोन्ही पाय सोबत राहणं हे आमचं कल्चर आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष समान आहे. आमच्या संस्कृतीवर टीका करणारे आज आमच्या कुटुंब संस्कृतीचा अभ्यास करायला लागले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या मातृ शक्तीच स्थान काय आहे. हे बघितलं तर तिला एक तर आपण मातेचं स्थान देतो नाही तर दासीचं. महिलेच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही. त्या स्वतः सशक्त आहेत. असं प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केलं. प्राचीन महिलांच्या खंडाचं नागपुरात लोकार्पण करण्यात आलं. यावेळी चिटणवीस सेंटर येथे ते आज बोलत होते.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, महिला या सगळं करू शकतात. महिलांना आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळते. तेव्हा त्यांना महिला आहे म्हणून थांबवू नका. या कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त आहे. मात्र पुरुषांची संख्या असायला पाहिजे होती. कारण आपल्या प्राचीन काळातील महिलांच्या कर्तृत्वाचं वर्णन या खंडात आहे. याचं तर श्रावणात पारायण व्हायला पाहिजे. मातृशक्तीचं किती मोठं योगदान आहे, हे बघा, असंही त्यांनी सांगितलं.
डॉ. भागवत म्हणाले, मात्र आताच्या घरात मातृशक्तीला किती महत्वं दिलं जात हे सुद्धा पाहिलं पाहिजे. यासाठी आपण जगायला पाहिजे. वेळेनुसार जगण्याची शैली बदलते. मात्र संस्कार मूल्य बदलायला नको. हे या ग्रंथातून शिकायला मिळते. आपल्या परिवारात या ग्रंथाची चर्चा करा. त्यातून नवीन पिढीत सुद्धा परिवर्तन होईल आणि मातृशक्तीचं महत्व वाढेल, असं वाटते.

Leave a Reply