भर पावसात निघालेल्या युवक काँग्रेसच्या “आजादी तिरंगा गौरव यात्रेने” वेधले लक्ष

नागपूर : १८ ऑगस्ट – भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात “आजादी गौरव तिरंगा यात्राचे” आयोजन करण्यात आले होते. भर पावसात निघालेल्या या तिरंगा यात्रेने उत्तर नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रत्येक कार्यकर्ता चिंब भिजत यात्रेत सहभागी झाला होता.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले. अमृत महोत्सवाच्या जल्लोषासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसतर्फे जरीपटका पोलिस स्टेशन चौकातून रॅलीला सुरुवात झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 व्या वर्षानिमित्त युवक काँग्रेसतर्फे 75 मीटर लांब असा भव्य तिरंगा हातात घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते भर पावसात जल्लोषात मार्गक्रम करीत होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी हा परिसर दणाणला होता. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , मौलाना अब्दुल कलाम आझाद यासारख्या थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकले आणि घोड्यावरील भारतमाता या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले होते.

जरीपटका पोलीस स्टेशन चौकात भारत मातेला नमन करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. भीम चौक, जरीपटका, बाराखोली, इंदोरा चौक, डॉ. आंबेडकर मार्ग, कमाल चौक असा मार्गक्रम करीत कमाल चौकात राष्ट्रगीत आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे पठण करून तिरंगा यात्रेचा समारोप झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते. या मार्गावरील प्रत्येक चौकात नागरिकांनी पुष्प वर्षाव करीत रॅलीचे स्वागत केले. प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा डौलाने लहरत होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रॅली दरम्यान कुणाल राऊत यांनी भीम चौक व इंदोरा चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन केले. “जयभीमच्या घोषणांनी हा परिसर दणाणला होता. बाराखोली टी-पॉइंट व बाराखोली चौक येथे ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, रेखा लांजेवर तसेच इंदोरा चौकात निशाद इंदुरकर यांनी पुष्प वर्षाव करून तिरंगा यात्रेचे स्वागत केले.

याप्रसंगी अखिल भारतीय सेवादलचे राष्ट्रीय समन्वयक कृष्ण कुमार पांडे, अखिल भारतीय सेवादलचे अनुसूचित जातिचे राष्ट्रीय समन्वयक राजेन्द्र करवाडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव संजय दुबे, नरु चिचकार, नागपूर शहरचे माजी उपाध्यक्ष व उत्तर नागपूर प्रभारी रत्नाकर जयपुरकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार, आसिफ शेख, पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, सतीश पाली, युवक काँग्रेसचे उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक परसराम मानवटकर, दिनेश यादव, नेहा निकोसे, महेंद्र बोरकर, महिला काँग्रेसच्या उत्तर नागपूर अध्यक्षा कल्पना द्रोणकर, राकेश निकोसे, आमिर नुरी, सतीश पाली, महिला अध्यक्ष कल्पना द्रोणकर, हिरा गेडाम,बेबी गौरीकर, परसराम मानवटकर, दिनेश यादव, नेहा निकोसे, मुलचद मेहर, महेन्द्र बोरकर, जान जोसेफ, रवि शेडे, अनिरुद्ध पांडे, आसिष मडपे, वसीम खान, गौतम अंबादे, निलेश खोबरागडे, श्रीलज पांडे, राकेश निकोसे, ज्योती खोबरागडे, इरशाद शेख, राकेश इखार, सचिन वासनिक, चेतन तरारे, कुणाल निमगडे, कल्पना द्रोणकर, मुना पटेल, शुशात गणवीर, हफिज अंसारी, निशाद इंदुरकर, आकाश इंदुरकर, विपुल महले, बाबु खान, रोनक नादगावे, रेखा लाजेवार, खतिजा अल्ली, संगीता टेभुरने, चदकाता साने, सुनंदा राऊत, संजय सहारे, निखिल सहारे, सन्तोष खडसे, मोईन सिद्दीक, रोशन अल्ली, स्वपनिल धाडे, राम यादव, निलेश गजभिये, आतिस रामटेके, विलेश हुमने, उमेश डवखरे, फेजुल कुरैशी, अनुस नयोगी, निलेश चदिकापुरे, गोपाल रजवाडे, संगीता ताडेकर, विलियम साखरे कृष्ण गजभिये, अजय वजारी, सलीम मस्ताना, जय मोरयानी, नावेद शोख, अमन काबळे, फरमान अर्ली, सुनिल नादुरकर, शेख शहनवाज, गणेश धुर्वे, पलास लिगायत, निलेश खोरगडे, अक्षय डोलीकर, प्रणय ठाकुर, कुणाल चौधरी,सादाब सोफी, रौनक नंदगावे, हर्ष बर्डे,जैनुल ओवेस,दया शाहू,सितीश साखरे,पारस गजभिये, अंकित बोहत, प्रवीण कड़बे, रॉयल गेडाम, मिथिलेश राजपांडे, , राजेश कोहाड, शेख सहाब्बुद्दिन, दसरुजी मरकाम, अंगेश्वर देवांगन, मृणाल वडीचार, विलास बारस्कर, देवा पाटील, पिंटू मोथनकर, राजेश साहू, शेखर मौंदेकर, नुर्जा बेगम, प्रशंशा कोहाड, रुक्साना बेगम, नरेंद्र मेश्राम, बंटी मेहर, ज्ञानेश्वर डेकाटे, देवांगन काका, शारदा तरारे, मनोज काळे, मिंनत्राव गिर्डे, शादब शेख, छगन शाहू, शागिर खान, रमेश निमजे, रोशन मोथनकर, अरण्या हटवार, आकाश लोखंडे, कुंदा ताई, पूनम काळे, शालू ताई, लीलाबाई पराते, स्विटी ताई, उमाकांत भाऊ, प्रज्वल ताई, डिंपल ताई, वांशिका, छकुली, कषिश काळे, प्रमोद बोरकर, मनोहर शाहू, देवराज देवांगन, कांता यादव, कृष्णराव केदार, चोवाराम मडावी, महेश्वरी तरारे, शिवानी कावरे, शबनम शेख, शहाणा अंजुम, शाहीदा बी, सुनिता तूर्कर, रितू मेश्राम, पुष्पा पराते, पूजा गौरिकर, अश्विनी पटेल, धम्मदिना जांभूळकर, संगीता सोंनकुसरे, भारती निखारे, दीपा कुटेमाटे, दीलेस्वरी शरणागत, गंगा लिखितकर, आसमा कुरैशी, रिजवान खान, नुरखा खान, फर्दिन बानो अहमद, गीता श्रीवास, अस्मिता पाटील , कांता साने ,नयना झाडे, शालिनी धोटे,अंजू बावणे, ललिता गायकवाड ,अनिसा खान, प्रिती नेताम ,रंजना मेश्राम, प्रिती नेताम, शालिनी सोनटक्के ,विद्या देशभ्रतार दीपा गावंडे ,संगीता दरवाडे,गौतमी नारनवरे, शालू उडाके, शाहिदा खान,वर्षा मेश्राम, चेतना गजभिये,सुनीता माटे,नीतू तिवारी, मनप्रीत धारीवाल,स्मिता फुलझेले, सपना मेश्राम, दीपा सहारे ,चंदा शंभरकर, मीना मेश्राम ,सीमा धारगावे,सुनीता रामटेके,रेखा चंदनखेडे,सिंधु चारबे,वीना दरवाडे, ज्योती पानतावणे, रीना भगत,किरण मेश्राम, चंदा नंदेशवर,मनिषा घोडेस्वार,रुचि वैद्य,नलिनी गौरखेडे,अंजली बनसोड,वंदना पाटील,वंदना टेंभुर्णे, राणी टेंभुर्णे, नलिनी नारनवरे, ज्योती पानतावणे आदि उपास्थित होते.

Leave a Reply