खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

नागपूर : १८ ऑगस्ट – नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात अपघात झाला आहे. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कोळसा वाहक स्टॅकर बेल्ट तुटून कामगारांच्या अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली आहे. यामध्ये संतोष मेश्राम आणि प्रवीण शेंडे यांचा मृत्यू झाला आहे.
दीड हजार टन वजन असलेला स्टॅकर बेल्ट काही दिवसांपासून नादुरुस्त होता, याबाबत अधिकाऱ्यांना सांगून देखील दुर्लक्ष केल्याने घडली घटना असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली जाते आहे.
कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे राख बंधारा आणि वीज केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरतील अनेक गावे प्रदूषणाचे गंभीर परिणाम सोसत होते. तेच पावसाळ्यात खसाळा राख बंधारा फुटून आणि खापरखेडा पाईपलाईन फुटून राख नदीत पोहचली. हेच पाणी शरीरात जाऊन धोकादायक ठरत आहे.

Leave a Reply