उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अमरावतीच्या श्रमिकाची विष प्रश्न करून आत्महत्या

नागपूर : १८ ऑगस्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानासमोरील त्रिकोणी पार्क येथे अमरावतीच्या श्रमिकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. कमलाकर केशवराव बोरकर (वय ५२, रा. कल्याणनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे.
सायंकाळी कमलाकर त्रिकोणी पार्क येथे आले व बाकावर बसले. याचदरम्यान त्यांनी विष घेतले. त्यांची प्रकृती खालावली. परिसरातील नागरिकांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी तैनात पोलिसांना माहिती दिली. येथे तैनात पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
कमलाकर यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांना गँगरिन झाले. त्यांचा पाय कापावा लागणार होता. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

Leave a Reply