पाणी भरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अमानुष अत्याचार

यवतमाळ : १७ ऑगस्ट – यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथ एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीचे आई, वडील मोलमजूरीसाठी बाहेर गेले असता मुलगी पाणी भरण्यासाठी कुपनलिकेवर गेली होती. दरम्यान आरोपीने मुलीला पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आई वडील कामाहून परत आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
त्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा. द. वी. चे कलम 376 सह पोकसो अंतर्गत गुन्हा दखल केला आहे. दरम्यान राज्यात बलात्कारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याविरोधात कडक कायदा करूनही नराधमांची कृत्ये काही कमी होताना दिसत नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply