सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असताना ब्रम्हपुरी शहरातील विहिरीतील २० ते २५ फूट पाणी झाले कमी

चंद्रपूर : १२ ऑगस्ट – ब्रम्हपुरी शहरातील मालडोंगरी रोडवरील नागेश्वरनगर येथील गजानन राऊत यांचे घरील पूर्ण भरून असलेल्या विहिरीतील २0 ते २५ फूट पाणी अचानक कमी झाल्याची घटना बुधवार, १0 ऑगस्ट रोजी ला पहाटे उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सविस्तर वृत्तानुसार, सध्या ब्रम्हपुरीसह सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. दमदार पावसामुळे शहरातील सर्वच खासगी, घरगुती विहिरी तुडुंब भरलेल्या असून विहिरीतून हातानेसुद्धा पाणी काढता येईल, एवढय़ा जवळ आले आहे. शहरातील मालडोंगरी रोडवरील नागेश्वरनगर येथील गजानन राऊत यांचे घरील विहीरसुद्धा दि. ९ च्या रात्रीपयर्ंत तुडुंब भरलेली होती. मात्र, १0 ऑगस्टला पहाटे विहीर पाहली असता तुडुंब भरलेल्या विहीरीतील पाणी तब्बल २0 ते २५ फूट खोल म्हणजे अंदाजे १0 ते १२ रिंग पाणी खोल गेल्याचे दिसले. तसेच खाली बुडबुडे निघत असल्याचे दिसून आले. भरलेली विहिर एकदम खाली झाल्याने राऊत परिवार गडबडून गेले. त्यांनी याबाबतची माहिती लगेच ब्रम्हपुरी नगरपरिषदमध्ये कार्यरत धनंजय पोटे यांना दिली. पोटे यांनी लगेच नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे धनंजय हटवार यांना संपर्क करून बोलवून घेतले. सदरचा प्रकार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. घटनेच्या तब्बल ५ ते ६ तासानंतर विहिरीत हळूहळू पाणी परत यायला लागले. वृत्त लिहिपयर्ंत विहिरीतील अचानक कमी झालेले पाणी पूर्वरत आले होते. मात्र, हा प्रकार कसा घडला याबद्दल चर्चा सुरू होती.

Leave a Reply