..वार-पलटवार – विनोद देशमुख

(अ)नीतीश ‘पलटुराम’ !

सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिक्किमचे पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. 1994 ते 2019 या काळात ते साडेचोवीस वर्षे मुख्यमंत्री होते. ते पाच वेळा या पदावर बसले. पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांचा दुसरा क्रमांक (साडेतेवीस वर्षे), पण सहा वेळा मुख्यमंत्री. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी वर्षांचा हा पल्ला गाठलेला नाही. पण, आठ वेळा मुख्यमंत्री होण्याचा अनोखाच विक्रम त्यांनी नोंदविलेला आहे.
वेळोवेळी मित्रपक्ष बदलत आपली खुर्ची कायम ठेवण्यात नीतीशकुमार वाकबगार आहेत ! समाजवादी असल्याने प्रथम जनता दल, नंतर जदयु, मग लालूंचा राजद, नंतर भाजपा, आता पुन्हा राजद असा त्यांचा मैत्रीप्रवास बावीस वर्षात झालेला आहे. केंद्रात अटलजी सरकारमध्येही ते मंत्री राहिले. या त्यांच्या ‘कौशल्या’मुळेच त्यांना बिहारच्या राजकीय वर्तुळात ‘पलटुराम’ असे उपहासाने संबोधले जाते !
मोदींना आव्हान देऊ शकणारा चेहरा म्हणून विरोधक त्यांच्याकडे पाहतात म्हणे ! पण मग, ममतादीदींचे काय होईल हो ?

विनोद देशमुख

Leave a Reply