बुलढाण्यात रस्त्यावरील नकली सोन्याचे मणी उचलण्यासाठी वाहतूक खोळंबली

बुलडाणा : १२ ऑगस्ट – बुलडाण्यातल्या डोणगाव इथून जाणाऱ्या औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्या परियांत रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेल्याचं लोकांना दिसलं. यानंतर ते उचलण्यासाठी अशी काही लगबग झाली की यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबवावी लागली.
सोन्याच्या मण्याची माहिती मिळाल्यावर प्रत्यकाची रस्त्याच्या कडेला पडलेले मणी पाहण्यासाठी नजर भिरभिरत होती. डोणगावमध्ये १० ऑगष्टला सकाळी ११ वाजता दरम्यान औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्या परियानंत मोटारसायकल स्वार, आजू बाजूचे दुकानदार, रस्त्याने जाणारे पदाचारी हे सोन्याच्या मण्यांचे लाभार्थी ठरले.
हा प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालला. सोन्याचे मणी सापडत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने त्रिगोनी परिसरातील लोकांनी इथे गर्दी करण्यास सुरूवात केली. रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकल स्वारांनीदेखील गाडी थांबवून मणी वेचने सुरू केले. या धावपळीला पाहता काहीकाळ महामार्गावरील वाहतूक सुद्धा थांबलेली होती.
सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले. महिलेच्या गळ्यातून माळ तुटून मणी पडले असल्याची चर्चा सुरू होती तर कोणी म्हणालं की चोरट्यांनी पोलिसांच्या धाकाने सोन्याचे मणी फेकून दिले असतील. अशात मात्र, काहींनी मणी फोडून पाहिल्यावर ते सरळ फुटून तुकडे-तुकडे झाले. ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्यासारखे दिसणारे नकली होते, याची खात्री पटली. या घटनेनंतर सगळ्यांनाच हसू आले.

Leave a Reply