विद्यार्थ्‍यांनी केला समूहगायनातून देशभक्‍तीचा जागर – आर. विमला

नागपूर : १० ऑगस्ट – समूहगायनातून विद्यार्थ्यांनी देशभक्‍तीचा जागर केला असे मत जिल्‍ह‍ाधिकारी आर. विमला यांनी व्‍यक्‍त केले. भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम व स्मार्ट सिटी शाखेच्‍या संयुक्‍तवतीने बी. आर. मुंडले शाळेच्या सभागृहात आयोजित करण्‍यात आलेल्‍या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत दक्षिण-पश्चिम व ग्रामीण भागातून विविध 28 शाळांनी भाग घेत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. स्मार्ट सिटीतर्फे नारायण विद्यालयम चिंचभवन शाळेने या स्‍पर्धेत प्रथम तर दक्षिण पश्चिम शाखेकडून भवन्स विद्या मंदिर, त्रिमूर्ती नगर ह्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
स्‍पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी आर. विमला यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी खादी ग्रामोद्योगचे सदस्‍य जयप्रकाश गुप्ता विशेष अतिथी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्‍यक्ष मकरंद पांढरीपांडे, अध्यक्ष, इतिश्री आर्टस् च्‍या संचालिका दीपाली घोंगे यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विदर्भ प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर घुशे हे होते. विद्यार्थ्‍यांनी हिंदी व संस्कृत भाषेतील देशभक्तीपर गीते सुमधुर संगीतासोबत, तालबद्ध स्वरात गायली. पारंपारिक वेशभूषा महान संस्कृतीच दर्शन घडवत होते. जयप्रकाश गुप्ता व श्रुती देशपांडे ह्यांच्याकडून “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत 200 तिरंगे शाळा व कार्यकर्त्‍यांना वितरीत करण्‍यात आले.
भारत विकास परिषदेचे कार्य देशप्रेमाचे प्रतिक असल्‍याचे मत जयप्रकाश गुप्ता यांनी व्‍यक्‍त केले. माधव लाभे, उत्कर्ष खोपकर, विजय दिवेकर, विजय दिवेकर, शशिकांत सुरंगळीकर, दिलीप गुळकरी, कौस्तुभ लुले व रंजना लाभे ह्यांच्या हस्ते विजेत्या 6 शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा इंदूरकर व श्रुती देशपांडे यांनी केले. दोन्ही शाखांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते व सम्पूर्ण सोहळ्यात सक्रिय सहभाग होता. भावीप स्मार्ट सिटी कडून अध्यक्ष रंजना लाभे, संघटन मंत्री संजय डबली, उपाध्यक्ष अजिता डोरलीकर, सचिव श्रुती देशपांडे, पालक शशिकांत सुरंगळीकर, सेवा प्रमुख डॉ महेश, कार्यक्रम प्रमुख अंजली बोरावार, संस्कार प्रमुख पारूल लाभे, अनिल देवाते ग्रामविकास प्रमुख संतोष आत्राम उपस्थित होते.

Leave a Reply