पावसाचा धुमाकूळ, नागपुरात शिवमंदिराचा काही भाग कोसळला, ५ जखमी

नागपूर : १० ऑगस्ट – राज्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजला आहे. दरम्यान राज्यात पावसाने अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. याचबरोबर दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तसेच नागपूर शहरातील भालदारपूरा भागातील दोनशे वर्ष पुरातन शिव मंदिराचा काही भाग आज (दि.१०) पहाटे कोसळला. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागपूरसह विदर्भात पावसाचा धुमाकुळ सुरु असून, ओढे नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहे. शहरातील अंबाझरी, फुटाळा तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. नागपूर शहरातील भालदारपुरा भागातील दोनशे वर्ष पुरातन शिव मंदिराचा काही भाग आज (दि.१०) पहाटे कोसळला. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या छोट्या छोट्या तीन घरांवर मंदिराचा काही भाग कोसळला. फायर ब्रिगेडने बचाव कार्य सुरू करत ६ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात भरती केले आहे.
गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाने कळविले आहे. तसेच शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान खात्याने आज व उद्या रेड अलर्ट चा इशारा दिला आहे.

Leave a Reply