नागपुरात अँमेझॉनला तीन कोटींचा गंडा

नागपूर : १० ऑगस्ट – आर्थिक व्यवहार ऑनलाईन होणे ही काळाची गरज असली तरी यातून आता फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहे. यावर कु ठलीही सेक्युरिटी नसून अशा फसवणुकीदार आरोपींचे मनसुबे आणखीच वाढले आहे. आल्या दिवसाला अशा घटना पुढे येत आहे. सर्वसामान्य असोत की आणखी कुणी सर्वांना याचा फटका बसला आहे. अशातच वस्तूंची घरपोच सेवा करणाऱ्या अँमेझानलाही या फसवणूकदारांनी सोडले नसून अँमेझॉनला चक्क तीन कोटींचा गंडा घातला आहे.
आरोपीने अँमेझॉनच्या ऑनलाईन विक्रीच्या प्रणालीमध्ये आधी बनावट विक्रेते व ग्राहकांचे खाते तयार केले. त्यानंतर ७ दिवसांत ५ हजार ७३१ बनावट कॅश अँन डिलिव्हरी ऑर्डर दिली. परंतु, घेतलेल्या वस्तूंची डिलिव्हरी न करता ऑर्डर रिटर्न केल्याचे दाखविले. विशेष म्हणजे कंपनीलाही चक्क चार महिन्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील हिंगणा रोडवरील प्लॉट क्रमांक १६ येथील रुक्मिणी मेटल अँण्ड जॉसेस लिमिटेड येथे अँमेझॉन ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस, प्रा. लि. नावाने सेंटर आहे. दरम्यान, कुणीतरी अज्ञात आरोपीने अँमेझॉन ऑनलाईन विक्रीच्या प्रणालीमध्ये कंपनीचे एकूण १२ लॉगीन आयडी केल्या. या माध्यमातून बनावट विक्रेते व ग्राहकांचे खाते तयार केले. त्यानंतर आरोपीने तयार केलेल्या खात्यांवरून ९ ते १६ एप्रिलदरम्यान ५ हजार ७३१ बनावट कॅश अँन डिलिव्हरी ऑर्डर दिली. परंतु, वास्तविक ऑडरची डिलिव्हरी केलीच नाही. उलट, डिलिव्हरी केल्याचे दाखविले. यानंतर आरोपीने पुन्हा ते ऑर्डर रिटर्न केल्याचे दाखवून अँमेझॉनच्या ऑटोमॅटिक रिफंड प्रणालीमधून रिफंड प्राप्त करून घेतले. अशाप्रकारे आरोपीने अंदाजे ३ कोटी रुपयांची फसवणूक केली. या फसवणुकीची रक्कम अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतरही अँमेझॉनसारख्या कंपनीलाही तो कळला नाही. चार महिन्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक हेमंत किशोर पाखोडे (वय ३२, रा. प्लॉट नं. ३८, राजापेठ) यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply