दोन दिवसांमध्ये होणार पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा ?

मुंबई : १० ऑगस्ट – कधी होणार…कधी होणार…म्हणत अखेरीस दीड महिन्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजून खातेवाटप झाले नसले तरी पालकमंत्र्यांच्या नावाची दोन दिवसांमध्ये घोषणा होणार आहे. याबद्दल आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेरीस कही खुशी कही गम वातावरणात पार पडला. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. भाजप आणि शिंदे गटातून प्रत्येकी ९ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा ही मोहिम राबवली जात आहे.
पण, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता येत्या दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होणार आहे. आज नव्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भात चर्चा होणार आहे. नवे मंत्री आपल्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply