गडचिरोलीत पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत

गडचिरोली : १० ऑगस्ट – जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने कहर केला होता. अनेकांचे घरे उध्वस्त झाले, हजारो एकर शेती जमीनदोस्त झाले होती. कही दिवस उंसत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे. गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा तालुक्यात काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड तालुक्यामध्ये अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन जन जीवन विस्कळित झाले. पावसाचा सर्वाधिक फटका चौथांदा भामरागडला बसला आसून पर्लकोटा नदीच्या पूल पाण्याखाली गेला आहे.
भामरागड तालुक्याचा मुख्यालयाशी पुर्णपणे संपर्क तुटला आहे. भारतीय हवमान विभागाने पुढील 48 तासाकरीता अतिवृष्टी इशार दिल्याने गडचिरोली प्रशासन दक्षाता घेण्यात येत आहे. नदी किनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी, नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये असे, प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
पर्लकोटा नदीच्या पुला जवळ सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भामरागड शहरा लागत वाहत असलेल्या पर्लकोटा नदीची पातळी वाढली आहे. चार कि.मी अंतरावरील कुमरगुडा नाला तसेच कुडकेली जवळच नाल्यावर पाणी वाहत असल्याने भामरागड आलापल्ली हा राष्ट्रीयमार्गवरील वाहतूक ठप्प झाला आहे. तालुक्यातील 60 ते 70 गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.
चौडमपल्ली नाल्यावर पुलावरुन पाणी वाहत असल्याने चंद्रपूर -अहेरी मार्गावर बंद करण्यात आला आहे. तसेच रेंगेवाही जवळील नाल्याला पुर आल्यामुळे मूलचेरा – आष्टी मार्ग बंद करण्यात आला आहे. आष्टी ते घोट मार्गावरील तुमडी नाल्यावर पाणी असल्याने सकाळी 8.00 वाजतापासून घोट मार्ग बंद, तसेच मुलचेरा कोपरअली मार्गही बंद आहे. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली पासुन एक कि.मी अंतरावर डुम्मे नल्यावर पूलावरुन पाणी जवेली मार्ग बंद आहे.अशे दक्षिण भागात सिरोंचा अहेरी भागत काहीप्रमाणात पावसाने विश्रांती दिली तरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, तालुक्यात पाऊसाचा हाहाकार सुरु आहे.

Leave a Reply