वर्धेत पुलावरील पाण्यात वाहून गेला पुलावरील रस्त्याचा डांबर

वर्धा : ९ ऑगस्ट – मध्यरात्रीपासून पावसाने जिल्ह्याला चांगलच झोडपून काढलं आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अश्यातच धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला पूर आलाय. या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर मार्ग वर्धा नदीच्या पुलावर पाणी असल्याने बंद झालाय. पाण्याच्या प्रवाहात याच पुलावरील डांबरीकरण वाहून जातानाच दृश्य कॅमेरात कैद झाला आहे
आज सकाळपासून या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. आता पुलावरील डांबरीकरण वाहून गेल्याने हा पूल खचल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे. पुराचे पाणी ओसरल्यावर या पुलाचे किती नुकसान झाले हे कळेल. मात्र सध्यातरी या मार्गांवरील वाहतूक बंद आहे.
मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणामध्ये पाणीसाठा 89 टक्के पुढे गेला आहे. त्यामुळे धरणाचे सर्वच 13 ही दरवाजे पहिल्यांदा तब्बल 230 सेमी उघडल्यामुळे मोर्शीवरून वर्धाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सात फूट पाणी आले. त्यामुळं मोर्शीवरून अमरावती व वर्धा जिल्हाचा संपर्क तुटला. अप्पर वर्धाच्या पुलावरून पाणी जात असल्याने मोर्शी व आष्टीची वाहतूक सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे, तर या धरणाचे पाणी वर्धा नदीला सोडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे.

Leave a Reply