एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोन अनमोल रतन – अमृता फडणवीस

मुंबई : ७ ऑगस्ट – अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील वैर नवीन नाही. मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायऊतार व्हावे लागल्यानंतर त्यांनी कशी नशिबाने थट्टा मांडली गाण्याचा उल्लेख करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या 37 दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरुच आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आजही दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी आज फ्रेंडशीप डेच्या औचित्याने #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने चांगलेच लक्ष वेधले आहे.
त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे. सोबत #friendshipday, #friendship, #friends, #sundayvibes, #maharashtra असे हॅशटॅग वापरले आहेत.
दुसरीकडे छोट्या पडद्यावरील बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी यावेळी अमृता फडणवीस यांना ‘कशी नशिबान थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला.
बस बाई बस कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांना नशिबान थट्टा मांडली हे गाणं ऐकवलं होतं. गाणं ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीचं नाव समोर येतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते.

Leave a Reply