अहमदनगरमध्ये दोन कोटींचा औषधाचा साठा पकडला

अहमदनगर : ४ ऑगस्ट – राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडवर एका गोदामावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दिड ते दोन कोटीच्यावर असणाऱ्या किंमतीचा औषध साठा पकडला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांसह, कोडीम कफ सिरफ, अल्फा झिरम, व्हायग्रा गोळ्यांचा साठा आढळून आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बेकायदेशीरपणे हा साठा करण्यात आला असून याच गोदामातून औषधांची छुपी विक्री सुरू होती. राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या नशेली औषधाच्या विक्री मध्ये कोणाचा सहभाग होता.तसेच औषध विक्रतेही पोलिसांच्या रडारवर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. छापा टाकण्यापूर्वी ज्यांनी औषधाचा साठा केला आहे. त्यांचा सकाळपासून शोध घेवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतू या आरोपींचे नावे पोलिसांनी सांगण्यास नकार दिला. अन्न व औषध प्रशासनाचे डी.एम.दरंंदले यांनी घटनास्थळी येऊन या औषधांची तपासणी सुरू केली. हि सर्व औषधे नशा भागविण्यासाठी वापरली जात असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे दरंदले यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर या औषधाची मोजदाद करण्यात आली असुन दिड ते दोन कोटीच्या रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिस सुत्रांडून समजले.
गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती. याची खबर पोलीस पथकाला लागली. राहुरी येथील चार ते पाच जणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, महिला पोलिस उप निरीक्षक ज्योती डोके, पो.काँ आजिनाथ पाखरे, प्रवीण आहिरे, दादासाहेब रोहकले, रवींद्र कांबळे, नदीम शेख, अशोक शिंदे, विकास साळवे, रोहित पालवे, चालक लक्ष्मण बोडखे, डीवायएसपी पथकातील पोलिस नाईक नितीन शिरसाठ, चालक सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे,होमगार्ड शाम कोबरणे,मनोहर मुसमाडे आदि फौजफाट्याने राहुरी शहर हद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिव चिदंबर मंगल कार्यालय शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्या ठिकाणी उत्तेजीत करणार्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणाऱ्या गोळ्या तसेच ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सुमारे दिड ते दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Reply