राज्यपालांच्या हस्ते होणार रागरंजनचे लोकार्पण

नागपूर : २ ऑगस्ट – नागपुरातील ख्यातनाम संगीतज्ञ, भारतीय लष्करासाठी भारतीय सुरावटीची पहिली भारतीय मार्शल ट्यून संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकार आणि स्थानिक आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तनुजा नाफडे लिखित रागरंजन या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी दु. १२ वाजता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. भगतसिंहजी कोश्यारी यांच्या शुभहस्ते नागपुरात आयोजित करण्यात आला आहे.
नागपुरात राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित या लोकार्पण सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसेवीका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्काजी या राहतील. ज्येष्ठ पत्रकार आणि दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक मा. श्रीपादजी अपराजित यांचीही विशेष उपस्थिती या समारोहात राहणार आहे.
डॉ. तनुजा नाफडे यांनी वृत्तपत्रांमध्ये संगीत अभ्यास या विषयावर लिहिलेल्या विविध अभ्यासपूर्ण लेखांचे संकलन रागरंजन या पुस्तकात करण्यात आले आहे. नागपूरच्या ओम साई प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ख्यातनाम संगीतज्ञ नीलाताई भागवत यांची प्रस्तवना लाभली आहे.

Leave a Reply