हे सरकार केव्हाही कोसळू शकते – एकनाथ खडसे

जळगाव : ३० जुलै – ‘शिंदे गटातील 16 आमदारांना एकतर वेगळा गट स्थापन करावा किंवा कोणत्यातरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकतं’असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत मोठा राजकीय पेच निर्माण झाला आह. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार कायम आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी आपला अंदाज वर्तवला आहे.
‘येत्या १ तारखेला निर्णय आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या 10 व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते, असं खडसे म्हणाले.
यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.
‘राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्वाचा आहे. त्या 16 आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यातरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकते, असं खडसे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

Leave a Reply