महाराष्ट्रात एथिक्स परीक्षेचे आयोजन लवकरच

नागपूर : २९ जुलै – थाईलेंड वर्ल्ड एथिक्स क्लब थाईलेंड व गगन मलिक फ़ाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात पहिलंदाच एथिक्स परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंबंधी धम्मकाया फ़ाउंडेशन थाईलेंड नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला सिद्धार्थ हत्तीअंबिरे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग (महाराष्ट्र कॉग्रेस कमिटी म.रा.) परभनी व नागपूरचे गगन मलिक फ़ाउंडेशनचे प्रमुख नितिन गजभिये याना फ़ाउंडेशनचे प्रतिनिधि म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सदर बैठकीचे अध्यक्ष पूज्य भदन्त पालामोधम्मो डॉ. पोर्नचाई पिनयापोंग वर्ल्ड अलायन्स ऑफ़ बुद्धिस्ट हे होते. यावेळी मिथिला चौधरी, सिस्टर अंजली (वर्ल्ड एथिक्स क्लबच्या मुख्य इंचार्ज) या प्रामुख्यने उपस्थित होत्या.
यावेळी एकूण १२२२ विद्यार्थीच्या सहभाग असणार असल्याचे गगन मलिक फ़ाउंडेशन प्रमुख नितिन गजभिये यानी प्रसिद्धि पत्रकाद्वारे सांगितले आहे. सदर परीक्षा ही ४ ते ७ व ७ ते १० या दोन वयोगटातील विद्यार्थीमध्ये होणार आहे. प्रथम येणाऱ्या विद्यार्थीना माघपूजाचा पावन पर्वावर थाईलेंड येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान सम्मानित करण्यात येईल, तसेच एकूण २० विद्यार्थीना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply