पद्मश्री मोहम्‍मद रफी पुरस्‍कार’ वितरण सोहळा 30 रोजी

नागपूर : २९ जुलै – मोहम्‍मद रफी फॅन्‍स कल्‍चरल ऑर्गनायझेशनच्‍यावतीने आयोजित ‘पद्मश्री मोहम्‍मद रफी पुरस्‍कार’ वितरण सोहळ्याचे शनिवार, 30 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे 2020 सालासाठीचा ‘पद्मश्री मोहम्‍मद रफी पुरस्‍कार प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांना तर 2021 सालासाठी प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्‍या हस्ते पुरस्‍कारांचे वितरण होणार आहे.
दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्र, नागपूरच्‍या सहयोगाने होणाऱ्या या कार्यक्रमाला अभिनेते जयवंत वाडकर, महालेखाकार प्रवीर कुमार, दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्यासह डॉ. गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, कुमार काळे, प्रकाश वाघमारे, राजाभाऊ टाकसाळे, समीर सराफ, संजय भेंडे, प्रगती पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याच कार्यक्रमात जलअभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन यांचा विशेष सत्‍कार करण्‍यात येणार आहे. त्यानंतर ‘रिमझिम के गीत’ हा संगीतमय कार्यक्रम होईल.
कार्यक्रम नि:शुल्‍क असून मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply