ओंजळीतील फुलं – महेश उपदेव

टायगर कॅपिटल

28 dec mahesh updeo final

पट्टेदार वाघांसाठी हिंदुस्थानात विदर्भ अव्वल स्थानी आहे. पट्टेदार वाघांन जगाती ल वन्यप्रेमी हिंदुस्थानात येवून नागपूर मार्गे विदर्भी तील व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात त्यामुळे नागपुर ला टायगर कैपिटल ही ओळख मिळाली आहे, किंवा वाघपूरा चे प्रवेश द्वार संबोधले जाते. व्याघ्र दिनाच्या निमित्ताने हा प्रपंच. राज्यात चारशे च्या जवळ पास वाघ आहेत त्यापैकी ३८७ च्या जवळ पास एकट्या विदर्भात आहे, या वाघांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, पट्टेदार वाघा साठी चंद्रपुर अग्रकमी आहे जवळपास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात २४० च्या जवळ पास वाघ आहेत या चे जतन व्हायला हवे कारण या वाघांवर शिकाऱ्यांची ही नजर आ हे

राज्यात गेल्या अडीच वर्षात ६० वाघां चा मृत्यू झाला आहे, विविध कारणांने वाघांचा मृत्यू झाला असला तरी त्याची खबरदारी घेण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात विदर्भात वाघांची संख्या वाढली आहे, दर चार वर्षानी वाघांची गणना होत असली तरी त्याची सुरक्षा होण्याची गरज आहे, वन्य प्रेमीना विदर्भ कडे आकर्षित करायचे असेल तर पर्यटना मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. मनुष्य व वाघा मधील संघर्ष थांबवायला पाहिजे, वाघाच्या हद्दी त नागरिकांनी अतिक्रमण केल्या मुळे संघर्ष वाढला आहे वाद्य ही जंगल सोडून गावाकडे यायला लागले आहे त्यातून युद्ध सुरु झाले आहे.

हिंदुस्थाना त २०१८ पर्यंत रेडिओ कॉलर केलेल्या वाघांची संख्या ५९ इतकी होती. गेल्या तीन ते चार वर्षांत ती किती झाली, याची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आली नाही. मात्र, रेडिओ कॉलरच्या माध्यमातून वाघांच्या स्थलांतरणाचा आलेख तयार होत असतानाच कॉलर केलेले काही वाघ बेपत्तादेखील झाले आहेत. त्यामुळे रेडिओ कॉलरच्या पूर्ण क्षमतेच्या वापरावर प्रश्नचिन्ह लागले आहे. केंद्र व राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून वाघांची सुरक्षा करण्याची गरज आहे. टायगर कैपिटल नाव टिकून ठेवायचे असेल तर सरकार बरोबर वन्यप्रेमी नी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

महेश उपदेव

Leave a Reply