११ वर्षीय चिमुरडीवर १० नराधमांचा दीड महिन्यांपासून सामूहिक अत्याचार

नागपूरः २८ जुलै – आई-वडील मोल-मजुरी करुन उदर निर्वाह करतात. पालक कामावर गेले असताना अकरा वर्षीय चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असायची. या चिमुकलीची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याची सर्वांना माहिती आहे. याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून काही काम असल्याने सांगून चिमुकलीला घरी बोलवले. आधी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर सतत दीड महिने आपल्या इतर साथीदारांना बोलवूनही चिमुकलीवर अत्याचार सुरु होता. पोलिसांना याची टीप मिळाली. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवून या माहितीची शाहनिशा केली आणि दहाही नराधमांना अटक केली आहे.
या प्रकरणाती मुख्य आरोपी रोशन कारगावकर (वय 29) हा चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो. त्याची या चिमुकलीकडे वाईट नजर गेली आणि त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले. रोशनची परिसरात चषम्याची छोटी दुकान आहे. तसेच त्याला काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात भादवी 302 अंतर्गत अटक केली आहे. या खुनाच्या घटनेच्या तपासादरम्यान माहिती घेतली असता नराधम रोशनच्या या कृत्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन या पूर्ण घटनेचा छडा पोलिसांनी लावला.
खुनाच्या आरोपात अटकेत असलेला रोशनचा तपास पोलीस करत होते. यादरम्यान याने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराची पोलीस तक्रार झाली नसल्याने या घटनेच्या पडताळणीसाठी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना वेशांतर करुन चौकशीसाठी पाठवले. त्यानंतर पोलिस तपासात या नराधमासह आणखी 9 जणांनीही या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती अघड झाली. ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी व्यतीरिक्त आणखी 9 जणांना बुधवारी अटक केली. सध्या सर्व आरोपींना 30 जुलै पर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.

Leave a Reply