केंद्रातील भाजप सरकारला लोकशाहीची थट्टा करायची आहे – नाना पटोले

मुंबई : २८ जुलै – राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या आदेशापूर्वी ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या ओबीसी आरक्षणाविनाच होतील असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला असून ही बाब मांडण्यासाठी सरकार कुठेतरी कमी पडलं आहे त्यामुळे सरकारने पुनर्याचिका दाखल करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर मिश्किल टीका केली आहे.
दरम्यान, आज कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दिलेल्या आदेशानंतर ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. त्यामुळे ९२ नगरपरिषदेतील ओबीसी उमेदवारांना याचा फटका बसणार आहे. यानंतर केंद्रातील भाजप सरकारला लोकशाहीची थट्टा करायची आहे, याचे नेते फोडा त्याचे फोडा असं राजकारण सध्या राज्यात आणि देशात चालू असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर नेत्यांवर दबाव टाकणे आणि नवी सत्ता स्थापन करणे हे राजकारण चालू असून राज्यात दोनंच लोकांंचं अपंग सरकार आहे. गेल्या एक महिन्यापासून दोन लोकांचं अपंग मंत्रिमंडळ काम करत आहे हे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही, कमीतकमी बारा मंत्री असणं आवश्यक असतं दोनच लोकं निर्णय घेत आहेत.” असा आरोप पटोले यांनी केला आहे.
“कुठं ना कुठं डाळीत काळं आहे, ते दिल्ली वारी का करतात? मंत्रिमंडळाचा विस्तार का थांबला आहे? जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हापासून ते दिल्लीत मुक्कामी आहेत. महाराष्ट्रातील सरकारची अशा प्रकारची अपंग अवस्था निर्माण करण्याचं काम केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Leave a Reply