अमरावतीत कॉलरामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

अमरावती : २८ जुलै – अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये 90 दिवसांत 52 बालके दगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलराची लागण झाल्याने एका 2 वर्षी चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर कॉलरामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अचलपूर तालुक्यातील शिंदी बू. गावातील वेदश्री निलेश मेहरे वय 2 वर्ष या चिमुकलीला कॉलराची लागण झाल्याने तिच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरू असताना काल अखेर मृत्यू झाला, तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
सिंदी गावातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकसहभागातून बोरवेल करून घेतल्या आहेत. या बोअरवेलमधून गावकऱ्यांनी टाकलेल्या पाइपलाइन चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामधून गेल्या आहेत. त्यामुळे हेच दूषित पाणी गावकरी पितात त्यामुळे वैदश्रीचा मृत्यू झाला असा आरोप गावकऱ्यांनी केला.
यापूर्वी मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी येथील 4 तर वलगाव येथील 1अश्या 5 नागरिकांचा कॉलेराने मृत्यू झाला आहे.

Leave a Reply