मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

विश्वासदादा

नियतीचा खेळ कसा असतो बघ.
एका क्षणाचा हिशोब चुकतो
आयुष्याचा आपला खेळ थांबतो
आधाराचा हात निसटून जातो
सोबतीचा फक्त भास उरतो
क्षण हा कधी आपला नसतो
पण आपण तो शोधायचा असतो
जन्मभर आनंदाचा शोध घेतो
खरंतर जगणं ह्यातच आनंद असतो.

खिडकीच्या काचेवर ओघळणारे पाणी जरा स्तब्ध झाले. काही प्रश्न मनात घर करून बसले. कोण जाणे त्याचे उत्तर आज कोणाकडे होते. मला समजणं ते खूप कठीण होतं. काल परवा इतक्या छान गप्पा केल्या. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही एकमेका जवळ विस्तृत पणे करायचो. अचानक एक दिवस त्याच्या दाढीतून रक्त येत. तो ही गोष्ट एकदम casual घेतो. पण त्याला काय माहित की आपला आता शेवट होणार आहे. डॉक्टर कडे जातो सगळ्या तपासण्या होतात. टेस्ट मध्ये कळत की कॅन्सर आहे. तो खूप हॅपी होतो. सगळ्या जाचातून आपली सुटका होईल. सगळ्यांना हसुन सांगतो की, मी खूप आनंदी आहे, पण मनातून तो खूप खचून जातो. हे केवळ त्याला माहित. केवळ हे समजण्यासाठी त्याक्षणी कदाचित तो भानावर नसावा. कोणाला वाटावं की मरण यावं? माझ्याजवळ नेहमी म्हणायचा, की माझे दिवस संपत आले. मला मरणाची चाहूल लागते आहे.
आणि ते खरं झाला. अचानक माझा फोन वाजतो आणि समोर आवाज येतो दादा गेला. विश्वास बसत नाही हे खरं आहे की खोटं. काय करावं काही समजत नव्हत. तेव्हा माझी स्पंदने ही बेभान होती. माझे विचार सैरभैर झाले. सगळ थांबल्या सारखे झाले. दादा गेला हे खरं होत की तो माझा भास होता समजायला काही मार्ग नव्हता.
डोळ्यातले पाणी थांबायचं नाव घेत नव्हते. कुठलीतरी मनात एक प्रकारची खंत सतावत होती.
माझे मन खळखळणाऱ्या नदीसारखे चंचल होत होते काहीच सुचत नव्हते. ओसरणारा पाऊस आणि खूप दाटून येणारी आठवण सगळ स्तब्ध होत.
आज सगळ आठवून माझे डोळे भरभरून रडत होते.
वेळ सरत होती आणि मनात काळोख. सांजवेळ सरायला आली. नभी काळोख दाटून आला. तशी आपसातले बोलणे आठवून माझ्या मनाची दारे रडण्यासाठी सरसावली. आणि एकच हंबरडा फोडला. सगळं मनातल साचलेल तळ हळूहळू स्वच्छ होत होतं. पण आठवण आपल्या स्मृतीत तशाच ताज्या राहतात. माणूस जातो पण आपल्या आठवणी तशाच राखून जातो त्या कायमच्या.
त्याचा सहवास आम्हाला दहा वर्ष लाभला. त्याचा सहवास आम्हाला डोक्यावरच्या छतासारखा होता.
आज जाता जाता तो डोळ्यात अश्रू ठेवून गेला. आज प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीत जातो. त्याच्या जाण्याने सुखाची किंमत ही मातीमोलच.
आपला जन्म कोणत्या कुळात व्हावा हे आपल्या हातात नसत. दादा जेवढा आयुष्य जगला ते खूप आनंदानी जगला. त्याच्या दारात आलेला कधीही रिकाम्या हाताने जात नव्हता.
त्याच्या आठवणी कायमच्या मनात घर करून गेल्या. मनाला जेव्हा वेदना होतात तेव्हा त्याची बोचरी काठ आपल्या मनात एक प्रकारचे शल्य करून राहतात.
व.पू. काळे चे एक वाक्य आता आठवले, रातराणीच्या फुलांचा सुगंध तुम्ही अंथरुणात पडून मनसोक्त घेऊ शकता, पण तुळशीचे झाड हे वृदंवनात असतं, तिच्यासमोर तुम्हाला हात जोडून उभच राहावं लागत.

पल्लवी उधोजी

Leave a Reply