परिवारासह जाळून घेणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नी पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी मृत्यू

नागपूर : २७ जुलै – कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे नागपूरमध्ये सात दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या त्याच्या मुलानेही अखेरचा श्वास घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात 19 जुलैला रामराव भट या व्यावसायिकाने कार मध्ये सह कुटुंब स्वतःला जाळून घेतले होते. त्या घटनेत रामराव भट यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान मुलगा नंदन याचा मृत्यू झाला तर दोन दिवसाआधी पत्नी संगीता यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे नागपूर पोलिसांनी रामराव भट यांच्यावर दोघांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला
आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या रामराव भट यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने अख्ख भट कुटुंबीय या अग्निकांडात जळून मृत झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते. मुलगा नंदन याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाब नंदन हा इंजिनियर असल्याने त्याची व्यवसाय करण्याची इच्छा होती आणि वडील त्याला नोकरीसाठी आग्रह धरत होते. त्यामुळे रामराव भट हे मागच्या काही दिवसांपासून काहीसे नाराज होते. त्यातूनच ही घटना घडल्याचा एक प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. वेगवेगळ्या कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना काळात लॉकडाऊन लागला त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते. त्यामुळे भट यांना व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानामुळे भट हे आर्थिक संकटात सापडल होते. भट यांचा मुलगा नंदन हा इंजिनियर होता. त्यामुळे त्यांनी मुलाला काम करून घराला हातभार लावण्याचे सांगितले. मात्र, नंदन काही काम करण्यास तयार नव्हता. त्यामुळे भट यांच्यापुढे पुन्हा मोठे संकट सापडले.
त्यामुळे भट यांनी आर्थिक विवेचनेतून सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मुलाला आणि पत्नीला कारने घेऊन वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन गेले. खापरी पुनर्वसन केंद्राजवळ पोहोचल्यावर त्यांनी आपली कार थांबवली. पत्नी आणि मुलाला पिण्यासाठी विष दिले. पण, दोघांना भट यांच्यावर संशय आला. त्यांनी विचारणा केली असता हे अॅसिडिटीचे औषध असल्याचे सांगितले. पण मुलाने हे औषध घेण्यास नकार दिला. कारमध्ये तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच भट यांनी पत्नी आणि मुलावर ज्वलनशील पदार्थ फवारला. त्यानंतर त्यांनी कारमध्ये पेट घेतला. पत्नी आणि मुलगा कारमधून जखमी अवस्थेत कसेबसे बाहेर पडले. पण भट यांचा गाडीत जळून मृत्यू झाला. जखमी अवस्थेत पत्नी आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता दोघांचाही मृत्यू झाला आहे. रामराज भट यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply