पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला स्वातंत्र्य कधी मिळणार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सवाल

नवी दिल्ली : २५ जुलै – भारतातील जम्मू, काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादी, फुटीरतावादी कारवाया पाकव्याप्त काश्मीरमधून होत असलेली घुसघोरी अजूनही थांबलेली नाही. याच कारणामुळे या भागात तैनात असलेले सैन्य आणि पोलिसांच्या दहशतवाद्यांशी अनेकवेळा चकमकी झालेल्या आहेत. असे असताना आता आरएसएस सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे आशेने पाहत आहे. तेथील जनतेला स्वातंत्र्य कधी मिळणार, असा सवाल केला आहे.
१९४७ सालापासून पाकिस्तानकडून पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद तसेच युद्धाला प्रोत्साहन दिले जात आहे. आपले सैन्य आणि पोलीस मागील अनेक वर्षांपासून याविरोधात लढत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारतीय सैन्यासोबत दहशतवाद, फुटीरतावादाशी लढा देत आहेत. त्यांचे मी आभार मानतो,” असे दत्तात्रेय होसाबळे म्हणाले.
“पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक दहशतवाद, फुटीरावादाचे बळी ठरत आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पाहत आहेत. त्यांना स्वातंत्र्य कधी मिळणार?” असा सवालही होसाबळे यांनी केला.
भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कल्म ३७० रद्द केल्यानंतर येथे अस्थितरतेचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या येथील परिस्थिती सामान्य असली तर येथील दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. पाकव्याप्त काश्मीरमधून अजूनही घुसखोरीचे प्रकार घडतात. याच कारणामुळे येथील सैन्य आणि पोलिसांनी कायम सतर्क राहावे लागते. असे असताना आरएसएसने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Leave a Reply