गगन मलिक फाउंडेशनच्या दानपारमिता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

24 july gagan malik

नागपूर : २४ जुलै – आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास सुरू झाला आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पोर्णिमा या कालावधीदरम्यान बुद्ध विहारात धम्माचे पठण करण्यात येते. या ९० दिवस म्हणजेच तीन महिने कालावधीत गगण मलिक फाउंडेशन ने वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या भिख्खूना रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू दान देण्याचा (दानपारमिता ) उपक्रम हाती घेतला आहे. या दानपारमिता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज सुगत नगर येथील सुगत बुद्ध विहारातील भिक्षुसंघास जीवनावश्यक वस्तुचें दान करण्यात आले.
वर्षावास कालावधीत उपासक, उपासिका धम्म ग्रहन करत असतात. त्यासाठी विहारात भिख्खू वर्षावास करण्यासाठी येतो. या तीन महिन्याच्या कालावधीत भिख्खु धम्माचे अध्ययन करुन उपासकांना धम्माचे उपदेश करीत असतो. या सर्व प्रक्रियेत भिख्खूला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विहारात पुरेशी व्यवस्था नसने किंवा उपासक फारसे जागृत नसने, या सर्व बाबी लक्षात घेता गगन मलिक फाउंडेशनने दानपारमिता उपक्रम हाती घेतला आहे. गगन मलिक फाउंडेशन भारतातील प्रत्येक जिल्ह्यात ज्या बुध्दीष्ट लेणी, चैत्य. विहार आहेत त्या सर्व स्थळांना भारताबाहेरील लोकांनी टुरीस्ट म्हणून यांव भारतातील इतर राज्यात व जिल्ह्यात अनेक लेण्या विहारे, उत्तखणणात सापडत आहे. ती सुध्दा विदेशी लोकांची पर्यटन स्थळ व्हावी. बुध्दगया सारनाथ या व्यतिरिक्त इतर राज्यात बुध्द संस्कृती आहे हे जगाच्या पर्यटकांना सांगणे हा मुख्य हेतू आहे. ज्या सम्राट अशोकानी ८४ हजार स्तृप, विहार, चैत्य बांधले त्या भूमीवर पून्हा बुध्दाची सावली निर्माण व्हावी यासाठी त्यांनी भारतात ८४ हजार बुद्ध मुर्ती स्थापित करण्याचा माणस त्यांनी घेतला आहे.
भारताबाहेर जगाच्या पाठीवर तिथल्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे बसविण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यात व्हीयतनाम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या सर्व उपक्रमांना सहकार्य करुन गगन मलिक फाउंडेशनचे जास्तीत जास्त सभासद आपण व्हावेत जेने करुन धम्म कार्य जलद गतीने करता येईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारत बौद्धमय करण्याचे जे त्यांचे कार्य होते त्या कार्याला हातभार लावता येईल. त्यासाठी आपण गगन मलिक फाउंडेशनचे सभासद बनुन या धम्मकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन नितिन गजभिये व प्रा. प्रवीण कांबळे यानी केले.

Leave a Reply