ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर

भंडारा : २४ जुलै – महाविकास आघाडी सरकार आता सत्तेवरून खाली आल्यानंतरही ईडीची पिडा नेत्यांच्या मागे कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. पटेल यांच्या होमग्राऊंड असलेल्या भंडाऱ्यात कार्यकर्त्यांनी “हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे” बॅनर लावून धीर दिला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात प्रफुल पटेल यांना धीर देणारे पोस्टर सद्धा चर्चेचा विषय ठरले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीद्वारे कारवाई करण्यात आली असून मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या सर्वांमुळे मात्र प्रफुल पटेल यांचे समर्थक चांगलेच दुखावले गेल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईने खचून जाऊ नये म्हणून त्यांना धीर देताना त्यांचे कार्यकर्ते दिसत आहे.
पटेल यांची नाळ भंडारा गोंदिया जिल्ह्याशी लहानपणापासून जुळली आहे. जिल्ह्यात त्यांचे अनेक समर्थक आहेत. तुमसर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व प्रफुल पटेल यांचे समर्थक इंजि. सागर गभने यांनी ‘रेडू’ या मराठी सिनेमातील गाण्याच्या ‘होईन पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको… उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे’ अशा ओळी बॅनरवर छापून प्रफुल पटेल यांना भावनिक समर्थन दर्शविणारे शहरात बॅनर लावले.
या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी प्रफुल पटेल यांना भावनिक धीर देत समर्थन दिले आहे. बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे” अश्या प्रकारचे बॅनर सध्या तुमसर शहरात झळकतांना दिसत आहे. सद्दा हे बॅनर चर्चेचा विषय बनलेला आहे.

Leave a Reply