आरे कारशेडच्या विरोधात आपचे आंदोलन

मुंबई : २४ जुलै – ‘आरे’मध्ये मेट्रो – 3 कारशेड होऊ नये या विरोधात शहरातील आम आदमी पक्षाने आंदोलन केले आहे. कारशेडच्या निर्मिताल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि इतर सामाजिक संघटनांकडून विरोध केला जात असून कारशेडचे काम सुरू करू नये अशी मागणी आप पक्षाकडून होत आहे. शिंदे – भाजप सरकारने आरेतच कारशेड बांधण्याच निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या निर्णयाविरोधात आता निसर्गप्रमी आणि इतर संघटना आक्षेप नोंदवत आहेत.
आरेमध्ये मेट्रो – 3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र, नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव गुंडाळला. तसेच, कारशेडसाठी इतर जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा आरेतच कारशेड करण्याचा निर्देश दिले आहेत. याचा विरोध होत आहे. आरे हे जैवविविधतेने संपन्न असून या प्रकल्पाने या निसर्ग संपत्तीला धोका निर्माण होऊन पर्यावरणाला देखील इजा होईल, असा काहींचा मत प्रवाह आहे. आप पक्षाने देखील कारशेड विरोधात आंदोलन करून भाजपविरोधात मोर्चा खोलला आहे.
आम आदमी पक्ष भविष्यातही लोकशाही पद्धतीने या प्रकरणी विरोध करणार. विकास कामाला आमचा विरोध नाहीच, मात्र आरेमधल हिरवळ आम्हाला वाचवायची आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असे आम आदमी पक्षातर्फे म्हटले जात आहे. मेट्रो कारशेड 3 कांजूरमध्ये व्हावे अशी मागणी पक्षाकडून होत आहे. याप्रकरणी भविष्यात न्यायालयात जण्याची आपली तयारी असल्याचेही आप पक्षाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply