बुरशी ग बुरशी, तु जिवाणूंची मावशी….” – डॉ. श्रीकांत राजे.

नमस्कार..

उन्हाळा संपला पावसाळा सुरवातीला कोरडा गेला. आता
भर “पूर” पडला. आता सर्व सृष्टी बहरते. जमिन सुध्दा जल धारण करते. वैताग सतत पडणारा पाऊस आणतो. “बाबा, थांब रे आता…” अशी म्हणण्याची वेळ आली ना ? तर असो.
आता बुरशी जन्य आणि जिवाणू जन्य आजार सुरु होतात.
बुरशी ही वनस्पती आहे. त्यामुळे प्रकाश आणि पाणी तिला “मस्ट” आहे. सोबत पोषणा साठी अन्नद्रव्य. आपली त्वचा आपल्या नकळत मृत पेशी त्वचेवर फेकतात.! ओल्या हवेतून बुरशी बीज त्वचेवर रोवल्या जाते आणि प्रकाश मिळाल्यावर ते वाढते.
ह्या बाळ तरुचे सर्व डॉक्टर मंडळी बारसं करतात….. कु ऽ र्र ऽ र
“फंगल इन्फेक्शन”

आता ही वनस्पती आहे. तिला ओल, प्रकाश, आणि खायला मृत पेशी “पायजे म्हणजे पायजे.”.. म्हणून आपली त्वचा “ओली” राहीली की “फंगल इन्फेक्शन” होत असते. पावसाळ्यात थोडे फार ओले असणारे कपडे आपण ” ऊं. ऽ काय होतं..” म्हणून घालतो, आणि जिथे ते पूर्ण कोरडे होत नाही. ओलसर राहतात, तिथे खाज सुटते. म्हणून जांघेत , कानात, बोटांच्या मध्ये, केसांच्या त्वचेवर, (कोंड्याच्या रुपात) आपल्याला हा आजार जाणवतो. आपण खाजवतो म्हणजे बुरशी
वनस्पतीला ” खुडतो” आणि नविन जागेवर “वृक्षारोपण” करीत असतो. ह्याला आपण “खाज” म्हणतो.

आता हे होऊ नये म्हणून काय करता येईल…

अत्यंत कोरडे असणारे सुतीच कपडे वापरावे. ते गरम करुन (तव्या सारख्या टीनावर) वापरले तर उत्तम.
सुती, गरम, शुष्क, कपड्या मध्ये ओलावा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. (ओल संपली की बुरशी हटली.)
आता “ओल्यावर” तेल वापरले तर “जडत्वा” मुळे पाणी खाली आणि तेल पृष्ठ भागावर राहते. पाणी वाळत नाही. (कारण वरुन तेल आहे) बुरशीला ओलावा आणि तेलातून खाद्य मिळते. म्हणून म्हणतात केस पुर्ण वाळल्याशिवाय तेल लावू नये. वाळल्यावर तेल लावलं की येणारी ओल “वर वर” राहते बुरशी मुळ धरु शकत नाही. केस पूर्ण वाळल्यावरच तेल लावले पाहिजे.
म्हणून काही जण रात्री तेल लावतात….
“कल सुबह देखा तो, बाल बनाती वो, खिडकी में आयी नजर… असं सुकेशीनीचे रुप ज्याने बघितले नाही त्याने चित्रगुप्ताला रिक्वेस्ट करुन पुन्हा मानवाचा जन्म मागावा.
आता अत्यंत कोरडी त्वचा आणि बाह्योपचार तेल ह्याने जवळपास 95%फंगल इनफेक्शन कव्हर होते

आता थोडं आहारा बाबत…
अति आंबट पदार्थ, शिळे पदार्थ, कच्ची फळं, खाणे. यासोबत योग्य प्रमाणात अन्नपचन न होणे. कमी झोप असणे. अति थंड पाणी पिणे. ह्यामुळे रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढते आणि त्वचेवर खाज येते.

अंगाची किंवा जांघेत, कानातील, केसातील खाज, हा अपचनामुळे रक्तद्रवात “निर्माण” झालेला तरी त्वचेवर “प्रगट” झालेला आजार आहे. यासाठी संतुलीत आणि ऋतुयोग्य पुरेसा आहार. योग्य प्रमाणात मल, मुत्र, स्राव, विसर्जन व्हायला हवे.

फंगस ही जिवाणूची मावशी. जिवाणूचे सर्व लाड पुरवून कुशीत जिवाणूंना खेळवते. नंतर जिवाणूंचा “बॅक्टेरियल इनफेक्शन” उग्र अवतार जन्माला येतो.
बुरशी ही जिवाणूची मावशी असली तरी आपली ती “पुतना” मावशी आहे. सुती, अत्यंत कोरडे कपडे, आणि तेलाचे चिलखत,
तेल लावण्या पूर्वी त्वचेची जागा सुती कापडाने गरम करुन शेकल्यास उत्तम अशा अस्र शस्राने आपली प्रकृती सिध्द करु या..

प्रकृती बाबत “हे असे कां..? अशा माझ्या मलाच पडलेल्या प्रश्नांना ज्यांनी मला आपलसं करुन उत्तर शोधायला प्रवृत्त केलं. अशा श्री. गुरु तत्वांना
श्री गुरु पौर्णिमे निमित्त सादर समर्पित.
आपणा सर्वांना श्री गुरु पौर्णिमे निमित्त निरामय आयुरारोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा….

पुन्हा भेटू या. असेच कधीतरी….

डॉ. श्रीकांत राजे
होमिओपॅथी चिकित्सक वाशीम.
9921548851

Leave a Reply