कुऱ्हाडीने वार करून युवकाने केली आईच्या प्रियकराची हत्या

नागपूर : २१ जुलै – कुऱ्हाडीने वार करून युवकाने आईच्या प्रियकराची हत्या केली. ही थरारक घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे. खुशाल (वय २५) असे मृतकाचे तर सूर्या (वय २३, दोघांची नावे बदललेली) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार, खुशालचे सूर्याच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत सूर्याला कळाले. हे संबंध संपुष्टात आणले नाही तर, तुला ठार मारेल, अशी धमकी त्याने खुशालला दिली होती. खुशालने त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी खुशाल हा घरी एकटा होता. सूर्या त्याच्या घरी गेला. त्याने खुशालसोबत वाद घातला. कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात खुशाल खाली कोसळला. सूर्या पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी खुशालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सूर्याला अटक केली.

Leave a Reply