सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांसोबत पोलिसांची चकमक सुरु

चंदीगड : २० जुलै – गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसंदर्भात पंजाबमधून मोठी बातमी आली आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील अटारी गावात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांसोबत अमृतसर पोलिसांची चकमक सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगरूप रूपा आणि मन्नू कुसा या मारेकऱ्यांसोबत चकमक सुरू आहे. अमृतसरच्या अटारी गावातील होशियार नगर, चिचा भकना गावात गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू आहे. हे दोन्ही गुंड गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अमृतसर पोलिस आणि गुंड यांच्यात अनेक ऐकमेकांवर गोळीबार सुरू आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. दोन्ही शूटर पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघेही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारसाठी काम करतात. दरम्यान, चकमकीत एक गुंड ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply