उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात  ‘माझे गाव- माझी शाखा’ अंतर्गत पहिल्या शाखेचे कुणाल राऊत यांच्या हस्ते उद्धघाटन

नागपूर : २० जुलै –    महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात व प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ‘माझे गाव- माझी शाखा’ अंतर्गत शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागलेत.
   या आदेशाचे पालन करीत उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात पहिली शाखा नवा नकाशा येथे स्थापन करण्यात आली. ‘माझे गाव- माझी शाखा’ व ‘माझी वस्ती – माझी शाखा’ अंतर्गत नागपूर शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेपासून खऱ्या अर्थाने ‘माझे गाव- माझी शाखा’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या माध्यमाने शाखेतील कार्यकर्ते परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करतील. हाच ‘माझे गाव- माझी शाखा’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीनिवास नालमवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव असिफ शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव पंकज सावरकर, युवक काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष तैफीक खान, सतीश पाली, शाखा अध्यक्ष शेख एहफाज, उपाध्यक्ष अंकित सारवन, शाखा आयोजक निषाद इंदूरकर, महासचिव मोहम्मद शब्बीर, सनी तांबे, अयाज अन्सारी, शाहीद अली, सचिव शेख हकीम, इमरोज अली, शहजाद खान,  आदी उपस्थित होते.

Leave a Reply