नागपूर : २० जुलै – अंबाझरी तलाव परिसरात मंगळवारी रात्री एका युवकाचा मृतदेह मिळाला. आपसी वादातून दोन युवकांनी त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. वृत्त लिहिस्तोवर प्रतापनगर ठाण्यात गुन्हा दाखल व्हायचा होता. मृतक संघर्ष मेर्शाम (२६) हा जयताळा येथील रहिवासी होता. तलावाच्या किनार्यावर झाडीत त्याचा मृतदेह सापडला. दोघा परिचितांनी त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. झोन क्रमांक १ चे पोलिस उपायुक्त लोहित मतानी, प्रतानगर ठाण्याचे निरीक्षक अरविंद रघुवंशी अंबाझरी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर आदी घटनास्थळावर दाखल झाले होते.
परस्पर वादातून युवकाची हत्या
- Post author:Panchnama
- Post published:July 20, 2022
- Post category:नागपूर
- Post comments:0 Comments