अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चा केली तर मार्ग निघेल – दीपाली सय्यद यांचे आवाहन

मुंबई : २० जुलै – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला ठेवली आहे. त्यानंतर लगेच अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्विट करत अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चा केली तर मार्ग निघेल, असे आवाहन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे. यातून त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली तर मार्ग निघेल. याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली, तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र असे ट्विट केले आहे.
शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या अगोदरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र यानंतर शिवसेनेत चांगलाच वाद उफाळून आला होता.

Leave a Reply