राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीन राऊतांच्या मतदानावर बबनराव लोणीकारांचा आक्षेप

नवी दिल्ली : १८ जुलै – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. एनडीएकडून द्रौपदी मूर्मू आणि यूपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २१ जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मतदान केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. नितीन राऊत यांनी रांगेत उभं राहून मतदान न करता आपल्याआधी मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. याविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच नितीन राऊत यांचं मत बाद केलं जावं अशी मागणीही त्यांनी आहे.
नितीन राऊत यांच्या विरोधात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. त्यांचं मत बाद करावं, ते अर्धा तास आधी मतदान करणाच्या सभागृहात कसे गेले? हा आमचा सवाल आहे. नियमाप्रमाणे माझा पहिला नंबर होता, मात्र त्यांनी आधी मतदान केलं हे सगळं रेकॉर्ड झालं आहे,” असं लोणीकर म्हणाले आहेत.

Leave a Reply