भंडाऱ्यात एकाच घरी निघाले ११ कोब्रा साप

भंडारा : १७ जुलै – पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होत आहे. पण, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका घरामध्ये एक दोन नव्हे तर 11 कोब्रा साप आढळून आल्याची घटना समोर आली आहे. आधी एक साप आढळला नंतर त्यापाठोपाठ अख्ख सापाचं कुटुंबच निदर्शनास आलं.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा येथे विलाश रामेश्वर कावळे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे. कावळे यांच्या घरात नाग जातीचे 11 पिल्ले व एक मादी पकडण्यात सर्प मित्राला यश आले आहे.
घरात 3 नाग जातीचे दीड फुट लांब पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली. घरात साप असल्याचे कळताच कावळे यांनी सर्पमित्रांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तुमसर येथील सर्पमित्र यांना पाचारन करण्यात आले त्यांच्या शोधमोहिमेत 11 दीड फुट लांब आणि तीन दिवसाचे पिल्ले व 5 फुट लांब मादी साप पकडण्यात यश आले.
सर्व नाग विषारी साप असून यात न्युरोटॉक्झीम विष असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. पिल्यांची संख्या जास्त असु शकते असा अंदाज वर्तवन्यात आला. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. कारण स्वयंपाक घरात एक खोलगट खड्डा आढळून आला. यात अंडे दिल्याचे समोर आले आहे. कोब्रा नागिणीने जवळपास 30 ते 35 अंडी दिली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पकडलेल्या सर्व सापांना वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
दरम्यान, बुलडाणा येथे राहणारे भवटे यांच्या घरी 5 फुट लांबीचा नाग (कोब्रा)विषारी पकडण्यात आला. भवटे व त्यांच्या पत्नीसोबत गॅलरीत बसले असता अचानक त्यांच्या समोरून साप गेला. सापाला पाहून ओरडायालाच सुरूवात केली परंतु न घाबरता त्या कोब्रावर लक्ष देत सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र यांनी कोब्रा सापाला पकडून जंगल परिसर सोडून दिले. रात्रीची वेळ असल्याने विषारी कोब्राला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. परंतु सर्पमित्र तात्काळ हजर झाल्याने घरच्यानी सुटकेचा श्वास सोडला.

Leave a Reply