संततधार पावसाने अमरावतीत दोन मजली इमारत कोसळली

अमरावती – अमरावती शहरात गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्ष जुनी दोन मजली इमारत दुपारी बारा वाजता कोसळली. खासदार नवनीत राणा या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. राज्यात सर्वदूर कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकणी पूरस्थिती तर पडझडीचे प्रकार घडत आहेत.
या इमारती दूध डेरी आणि इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान होते. दूध डेअरीमध्ये असणारे एकूण सात फ्रिजर तुटले असून आज सुमारे पाचशे लिटर दूध वाया गेले आहे. या इमारतीत असणाऱ्या दोन्ही दुकान मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील जे जिल्हे रेड आणि ऑरेंज झोन मध्ये आहेत अशा जिल्ह्यांमधील सर्व शहरात असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्वरूपाची हानी पुन्हा कुठेही होऊ नये यासाठी स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याचे निर्देश देखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिले.

Leave a Reply