मुंबई, कोल्हापूर, नाशिक, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई : १२ जुलै – कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार आहे.
दोन दिवसाच्या रिमझिम पावसामुळे अनेक भाविक बाहेर पडलेच नसल्याचे चित्र दिसत असून छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यापूर्वीच्या आषाढी एकादशीमध्ये छोटे व्यवसायिक 50 ते 60 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल करत असत. त्याच व्यवसायांची गेल्या तीन दिवसापासून केवळ चार ते पाच हजार रुपये सुद्धा आर्थिक उलाढाल झाली नसल्याचे सांगत आहेत. एकंदरीतच कोरोनाच्या महामारीनंतर मोठ्या आशेने आषाढी एकादशीची वाट पाहणाऱ्या व्यवसायिकांमध्ये गेल्या दोन दिवसांच्या पावसाने नाराजी पसरली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रात प्रभावामुळे येत्या 14 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा तसेच आज या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या 2 विभागांना पुढील 5 दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवाधार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासांत नाशिकसह परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर (दि १०) रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान 7.7 मिलिमीटर पाऊस झाला. यानंतर रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान 6.4 मिलिमीटर पाऊस झाला. तर रात्री साडेअकरा ते पहाटे 35.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
नागपुरात पावसाचा धुमाकूळ – नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
चंद्रपुरात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा – भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply