पंतप्रधान व राष्ट्रपतींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : १० जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद-अल-अधा म्हणजेच बकरी ईदनिमित्त शुभेच्छा ( दिल्या. ‘हा सण आपल्याला मानवजातीच्या भल्यासाठी सामूहिक कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी कार्य करण्यास प्रेरणा देईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.
ईद अल-अधा किंवा बकरी ईद आज सर्वत्र साजरा केला जात आहे. बकरी ईदला ‘बलिदानाचा सण’ देखील म्हटले जाते. हा सण इस्लामिक किंवा चंद्र कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या धु अल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. आज वार्षिक हज यात्रेची समाप्ती होत असते. दरवर्षी ईदची तारीख बदलते कारण ईद ही इस्लामिक चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे. हे कॅलेंडर 365-दिवसांच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 11 दिवस लहान आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईद-अल-अधा निमित्त सर्व देशवासियांना, विशेषत: आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा सण त्याग आणि मानवसेवेचे प्रतीक आहे. या निमित्ताने मानवजातीच्या सेवेत स्वतःला झोकून देऊन देशाच्या समृद्धीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करूया.

Leave a Reply