हे देखील माहित असू द्या

८ जुलै १९१०ची पहाट…

जगाच्या इतिहासाने एका मोठ्या पराक्रमाची या दिवशी नोंद घेतली…
मार्सेलीस बंदरावरील स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी…

‘उडी नव्हे… भारतीय स्वातंत्र्याची गुढी’

मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर आहे हे माहीत असताना जहाजाच्या शौचकुपातून गावक्षाची(पोर्टहोलची) काच फोडून, त्याच्या १२इंच व्यासातून ३२ इंच छाती काढून, रक्तबंबाळ शरीराने ‘स्वातंत्र्यलक्ष्मीकी जय’ म्हणत अपरिचित समुद्रात तेही इतक्या उंचावरून उडी मारणं ही काही साधी गोष्ट नाही. घाबरून दगमागून उडी मारण्यास जरातरी चूक झाली असती तर काहीही होऊ शकलं असत. विहिरीत पोहणं, स्विमिंगपूलमध्ये सौरक्षण असताना पोहणं आणि यमाच्या हातातून निसटून पोहणं यात खूप फरक आहे. पण काही तथाकथित (अ) विचारवंतांना ते कळत नाही. असो…

‘ही अशी उडी बघताना । कर्तव्य मृत्यू विस्मरला।।
बुरुजावर फडफडलेला । झाशीतील घोडा हसला।।
वासुदेव बळवंतांच्या । कंठात हर्ष खदखदला ।।
क्रांतीच्या केतू वरला । अस्मान कडाडून गेला।।
दुनियेत फक्त अाहेत । विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता ।सागरास पालांडुन ॥
हनुमंतानंतर आहे । या विनायकाचा मान ॥’

सावरकर निसटल्याचे कळताच इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी लहान होड्याघेऊन त्यांचा पाठलाग करू लागले. सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या दिशेने पोहू लागले. मागून गोळ्या झाडल्या गेल्या…
पण सावरकरांना जिवंत पकडणं गरजेचं होतं. सावरकर मार्सेलीस बंदरावरील दोराला पकडून वर चढू लागले. ते इतके कर्णभेदी होते की बंदुकातून झाडल्या गोळीचा आवाज ऐकताच त्यांनी तो दोर सोडला आणि पुन्हा चढण्यास सुरुवात केली…
शेवटी त्यांनी फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवलाच…
त्यांनी एक फ्रेंच पोलीस ‘ब्रिगेडियर पेस्की’ याला स्वतःला पकडण्याची विनंती केली पण धड त्याला सावरकर काय म्हणतात हे कळत नव्हतं आणि सावरकरांना फ्रेंच येत नव्हते. मुळात तो प्रसंगच थोडा गोंधळाचा होता. तेव्हढ्यात इंग्रज पोलीस तेथे आले व फ्रेंच पोलिसांच्या हाती काहीतरी टेकवून सावरकरांना घेऊन गेले.

(‘फ्रान्स’ मध्ये ‘ब्रिटन’ अधिकाऱ्याने सावरकरांना पकडणं हे आंतराष्ट्रीय कायद्याविरुद्ध होत.)
ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता त्या साम्राज्याच्या नाकावर तिचून, त्याच्या ध्वजासमोर (युनियन जॅक), त्याच्या अधिकाऱ्यांना चकवून सावरकरांनी आंतराष्ट्रीय स्तरावर ही क्रांती घडवून आणली. आंतराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवली आणि जगाचं लक्ष भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाकडे वेधून घेतलं. इंग्रजांचा गर्वहरण होऊन या कृत्यासाठी त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर माफी मागावी लागली आणि फ्रांसच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.

जहाजावर नेऊन सावरकरांना मारण्याचा प्रयत्न झाला पण मला मारलं तर एक दोघांना नक्कीच आधी मारेल हा विश्वास त्यांना होता. नित्य व्यायाम, योग यामुळे त्यांचे शरीर कणखर होते.
या प्रसंगी सावरकरांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जी कविता बाहेर पडली ती कविता म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचे दर्शन होय. प्रत्येक वेळेस शत्रूच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी चंदनासारखं झिजत राहून त्यांनी मृत्यूलाही घाबरवून सोडले की तो कधी त्यांच्या जवळ आलाच नाही…
शत्रूही किती मूर्ख असावा जो मृत्यू सावरकरांना घाबरून लांब पळतो त्याचीच भीती सावरकरांना दाखवतो.

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥

अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्‍नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ॥

लोटि हिंस्‍त्र सिंहाच्या पंजरीं मला
नम्र दाससम चाटिल मम पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्‍त्र अस्‍त्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ॥

या पराक्रमी वीराला कोटी कोटी वंदन

समाजमाध्यमावरुन साभार….

Leave a Reply