राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एन.एल. येवतकर यांना ‘एक्सलंन्स अवार्ड २०२१’

नागपूर : ८ जुलै – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर विभागाचे प्रकल्प संचालक व महाप्रबंधक (तांत्रिक) एन.एल. येवतकर यांना ‘एक्सलंन्स अवार्ड २०२१’ ने गौरवण्यात आले.
दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येवतकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर-रायपूर (महामार्ग क्र. ५३) मार्गावरील साकोली व लाखनी येथील उड्डाण पुलाच्या उत्कृष्ट बांधणीसाठी हा पुरस्कार येवतेकर यांना देण्यात आला.
कोलीतील उड्डाण पुल २८.२ मीटर ‘स्पॅन’ एका पिल्लरवर आहे. अशाप्रकारचे काम भारतात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. पुलावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या कामाचा गौरव बिर्ला आणि गडकरी यांनीही केला आहे.

Leave a Reply