नागपुरात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर

नागपूर : ८ जुलै – उपराजधानीत पावसाचा जोर आज(शुक्रवार) दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच पंचाईत झाली.
गुरुवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस आज दुसऱ्या दिवशी देखील कायम होता. काल झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते तुंबले होते. तर अनेक सखल भागात पाणी साचले होते. आजही ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची स्थिती आता आणखी बिकट झाली आहे. यात वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
दरम्यान शहरातील तरुणाई मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसत असलेल्या पावसाचा आनंद घेत आहे. अंबाझरी तलावसह फुटाळा तलावावर देखील मक्याची कणसे खात आणि चहाचा आस्वाद घेत पावसाचा आनंद घेणारी तरुणाई दिसून येत आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरात देखील मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. तर अकोला शहरातही रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला.

Leave a Reply