अकोल्यातील ज़िल्हा परिषद शाळेत २०० विद्यार्थ्यांमागे फक्त २ शिक्षक

अकोला : ८ जुलै – एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे पहायला मिळत आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध ते पिल्यावर सगळेजण गुरगुरतात, असे म्हटले जाते. मात्र, विद्यार्थ्यांना जर शिक्षणच मिळत नसेल तर याला म्हणावा तरी काय असा प्रकार पातुर तालुक्यातील मळसूर येथील जिल्हा परिषदच्या शाळेत सुरू आहे. या जिल्हा परिषद शाळेत 200 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक मात्र दोनच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक करीत आहेत.
एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे पहायला मिळत आहे. शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मळसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 200 च्यावर विद्यार्थी असून शिक्षक मात्र दोनच असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे.
पातुर तालुक्यातील मळसूर येथे जिल्हा परिषदेची शाळा असून ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. शाळेत 200 विद्यार्थी असून शिक्षक मात्र, केवळ दोनच असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पालक आपली मुले इतर शाळेत पाठवत असून यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या देखील कमी होत आहे. त्यामुळे शाळेला शिक्षक देण्याची मागणी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यांनी केली आहे.
शाळेत शिकत असलेल्या मुलांकडून सुद्धा शिक्षकांची मागणी होतं आहे. मुलं शिक्षकासाठी टाहो फोडत आहे. शिक्षक कमी असल्यामुळे आमच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. आम्हाला लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. पावसाळ्यात शाळेच्या इमारतीच्या छताला गळती लागल्याने विद्यार्थ्यांना बसण्याची गैरसोय होतं आहे.याकडे वरीष्ठांनी लक्ष देऊन शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी सुद्धा होत आहे.
पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मळसूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. शाळेच्या चारही खोल्या जीर्ण झाल्यामुळे मुलांना बाहेर बसावे लागत आहे. शाळेत शिक्षकांचीही संख्या कमी आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर या शाळेला शिक्षक द्यावे. आणि शाळेची दुरुस्ती देखील करावी अन्यथा शाळेला कुलूप लावण्याचा इशारा ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष गोपाल कंकाळ यांनी दिला आहे.

Leave a Reply