दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू

नागपूर : ६ जुलै – तीनपैकी दोन लहान मुलींची प्रकृती अचानक खराब झाल्याने आईने दोघींनाही मंगळवारी (दि. ५) सकाळी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती एकीला मृत घोषित केले, तर दुसरीवर प्रथमोपचार करून नागपूर उपचारासाठी पाठविण्यात आले. वाटेतच तिचा मृत्यू झाला.
साक्षी फुलसिंग मीना (६) व राधिका फुलसिंग मीना (३) अशी मृत बहिणींची नावे आहेत. साक्षी व राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना बरबटेकडी, ता. कोंढा, जिल्हा बारा, राजस्थान येथील रहिवासी आहे. त्यांचे माहेर पाटणसावंगी आहे. तिला साक्षी व राधिकासह पूनम (९) ही मोठी मुलगी आहे. माधुरी यांच्या वडिलांचे झाल्याने त्या तिन्ही मुलींना घेऊन पाटणसावंगी (ता. सावनेर)ला आई गंगाबाई भय्याजी काळे हिच्याकडे आल्या. साक्षी व राधिकाची प्रकृती खराब झाल्याने तिच्या आईने दोघींनाही सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कापटे यांनी तपासणीअंती राधिकाला मृत घोषित केले, तर साक्षीवर प्रथमोपचार करून नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात रेफर केले. मात्र, गावापासून दोन किमीपयर्ंत जाताच वाटेत साक्षीचाही मृत्यू झाला. दोघींना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply